Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रात्री पार्टीला गेली अन सकाळी पोलीस झाले हैराण !
    क्राईम

    रात्री पार्टीला गेली अन सकाळी पोलीस झाले हैराण !

    editor deskBy editor deskAugust 23, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

     

    देशात अनेक वर्षापासून प्रेमानंतर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची अनेकांमध्ये मोठी क्रेज आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे एक युवक आणि युवती एकत्र राहत होते. एकेदिवशी सकाळी अचानक त्यांच्या घरातून गोळीचा आवाज आला. ही गोळी त्या मुलीला लागली होती तर तिच्यासोबत राहणारा युवक बेपत्ता होता. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. परंतु तपासात अशा गोष्टी बाहेर आल्या ज्यामुळे पोलीस हैराण झाले.

    लखनौच्या उच्चवस्तीत परिसरातील सुशांत गोल्फ सिटीमधील पॅराडाइज क्रिस्टल अपार्टमेंटमधील ही घटना आहे. १७ ऑगस्टच्या रात्री पोलिसांना एक कॉल आला. कॉल करणारी महिला होती. जी रडत होती. रडता रडता तिने पोलिसांना सांगितले की, माझ्या मुलीला गोळी मारली असून तिचा मृत्यू झालाय. या फोननंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. खोलीत मुलीचा मृतदेह पडला होता. मृतदेहावर गोळीबारीचा खूणा होत्या. एक डोक्यात तर दुसरी छातीत गोळी लागली होती. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

    या युवतीला लिव्ह इन पार्टनरने गोळी का मारली? दोघांमध्ये काय वाद होता? युवतीसोबत राहणारा पार्टनर कुठे आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधायची होती. तपासात कळाले की, मृत युवती रिया ही व्यावसायाने मेकअप आर्टिस्ट होती, ती खुल्या विचारांची होती. रिया दिसायला सुंदर होती. त्याचसोबत सोशल मीडियात बरीत एक्टिव्ह होती. इन्स्टावर तिचे लाखो फोलोअर्स होते. ज्या फ्लॅटमध्ये तिचा मृत्यू झाला तो तिनेच भाड्याने घेतला होता आणि ऋषभ सिंह नावाचा युवक तिच्यासोबत राहत होता. रियाचे घरचे लखनौमध्येच वेगळ्या भागात राहायचे. दररोज रियासोबत त्यांचे बोलणे होत असे. १७ ऑगस्टच्या सकाळी रियासोबत बोलणं झाले नाही, तिचा फोन उचचला जात नव्हता म्हणून आई तिच्या घरी पोहचली. तिच्या घरचा दरवाजा आतून बंद होता. जेव्हा आईने दरवाजा उघडला तेव्हा रियाचा मृतदेह खोलीत आढळला.

    घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनी रियासोबत राहणाऱ्या ऋषभ सिंहचा शोध घेणे सुरु केले. अनेक ठिकाणी छापा टाकल्यानंतर पोलिसांनी एका ठिकाणाहून ऋषभला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच ऋषभने हत्येची कबुली दिली. १६ ऑगस्टच्या रात्री रियासोबत तो एका पार्टीला गेला होता. तिथून परतताना रियासोबत त्याचे भांडण झाले. रिया पार्टीत दुसऱ्या मुलांशी बोलत होती. त्यामुळे ऋषभ नाराज झाला. रात्री दोघेही नशेत होती. त्यामुळे दोघे झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यात रागाच्या भरात ऋषभने रियाला २ गोळ्या मारल्या. इतकेच नाही तर रियाच्या आईने तपासात जे सांगितले ते हैराण करणारे होते. एका पार्टीत ऋषभसोबत रियाची ओळख झाली. त्यावेळी तिच्या ड्रिंकमध्ये ऋषभने गुंगीचे औषध दिले होते. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करणे सुरु केले. रियाला ऋषभसोबत राहायचे नव्हते परंतु ब्लॅकमेल करून रियाला त्याच्यासोबत राहणे मजबूर केले. अलीकडेच या प्रकरणी १०९० नंबरवर कॉल करून पोलीस तक्रार केली होती. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

    #police Crime Party
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पुणे जमीन घोटाळा : पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही? दमानियांचा थेट सवाल

    December 22, 2025

    बांगलादेशात राजकीय हिंसाचार वाढला : नेत्यावर घरात घुसून गोळीबार

    December 22, 2025

    जळगाव : धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

    December 22, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.