• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महामार्गावर भीषण अपघात : चालकासह तीन महिलांचा दुर्देवी मृत्यू !

editor desk by editor desk
August 23, 2023
in क्राईम
0
महामार्गावर भीषण अपघात : चालकासह तीन महिलांचा दुर्देवी मृत्यू !

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना एक भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळजवळ महिला भाविकांच्या चार चाकी मोटारकारची मालमोटारीला धडक बसून घडलेल्या अपघातात कारचालकासह तीन महिलांचा मृत्यू झाला. तर अन्य सहाजण जखमी झाले. सर्व मृत व जखमी अहमदनगर जिल्ह्यातील रांजणगाव (ता. पारनेर) येथील राहणारे आहेत.

बुधवारी पहाटे सुमारास घडलेल्या या अपघातातील मृतांची नावे अशी-कारचालक आदमअली मुनवरआली शेख (वय ३७), हिराबाई रामदास पवार (वय ७५), कमलबाई मारूती वेताळ (वय ६०) आणि द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय ४०). जखमींमध्ये बाळी बाबू पवार (वय २७), छकुली भुमा पवार (वय २७), साई योगीराज पवार (वय ७), सुरेखा भारत मोरे (वय ४५) आणि बायजाबाई रामदास पवार (वय ६०) यांचा समावेश आहे. रांजणगाव येथून पहाटे एका ईको मोटारीतून (एमएच ४६-एपी ४१२०) तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी महिला भाविक निघाले होते. करमाळा-टेंभुर्णीचे अंतर पार करून मोटार सोलापूरच्या दिशेने येत असताना मोहोळजवळ मोटार एका मालमोटारीला पाठीमागून जोरात आदळली आणि हा मोठा जीवघेणा अपघात झाला. यात कारचालकासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एका महिलेचा सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना थोड्याच वेळात मृत्यू झाला. सहा जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Tags: #accidentsolapur
Previous Post

ठाकरेंच्या शिवसेनेत माजी खासदार दाखल !

Next Post

११ दिवसांनी अल्पवयीन मुलीची मृत्यूशी झुंज संपली !

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

११ दिवसांनी अल्पवयीन मुलीची मृत्यूशी झुंज संपली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group