लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ शहरातील एका लॉन जवळ युवक अवैध शस्त्र बाळगणे फिरत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी मी एका 23 वर्षीय युवकाला गावठी कट्टा सह अटक केली याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलिसांना एक युवक हिरा हॉल परिसरात गावठी कट्टा कमरेला लावून फिरत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ
पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घायतल,एएसआय तस्लीम पठाण, सहा.फौजदार शरीफोदिन काझी, हवालदार मिलिंद कंक, सत्तार शेख, नाईक दीपक कापडणे, योगेश माळी, प्रणय पवार आदींच्या पथकाने संशयीत रोहन पितांबर पाटील (23, रा.गजानन महाराज मंदिराजवळ , कंडारी, ता.भुसावळ) या आरोपीला अटक करून त्याच्या ताब्यातून 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून त्याच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हयाचा तपास परीविक्षाधीन
पोलीस उपनिरीक्षक महेश घायतल करीत आहे.
या घटनेपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी भुसावळ मधूनच एका युवकाकडून गावठी कट्टा जप्त केला होता लागलीच पुन्हा दुसऱ्या घटनेत बाजारपेठ पोलिसांनी गावठी कट्टा जप्त केलं आणि यापूर्वी अनेक घटनांमध्ये बाजारपेठ शहर पोलीस स्टेशन या भागातून गावठी कट्टे जप्त झालेले आहे तरी पोलिस प्रशासनाने अवैध शस्त्र विकणाऱ्या मुख्य सूत्रधार अटक होणार की नाही हा प्रश्न उपस्थित होतोय इतक्या मोठ्या प्रमाणात शहरातून गावठी कट्टे गेल्या काळात जमाजा जप्त करण्यात आल्यावरही पोलीस प्रशासन फक्त बाळगणाऱ्या आरोपींना घटक करते पण त्यामागील मुख्य सूत्रधार कोण याला आजपर्यंत पोलिस प्रशासन पकडू शकलेले नाहीत