मुंबई : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील चोरी ची एक घटना सध्या चांगलीच चर्चेची ठरली आहे. काय तर या चोरट्यांनी चोरी केली. चोरीही मोठी होती. परंतु चोरी करण्यापूर्वी त्यांनी ज्योतिषीचा सल्ला घेतला होता. मग तो सल्ला कितपत यशस्वी झाला? परंतु हे चोरटे मात्र चोरी केल्यानंतर पोलिसांच्या सापळ्यात आले. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये एक कोटी रुपयांची चोरी झाली होती. सागर गोफेन यांच्या घरी ही चोरी झाली होती. ते घरी नसताना त्यांच्या पत्नीस चोरट्यांनी बंधक बनवले होते. त्यानंतर त्यांच्या घरातून 95 लाख रुपये रोकड आणि 11 लाख रुपये किंमतीचे सोने, चांदीचे दागिने घेऊन फरार झाले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर आरोपींची ओळख पटली. तपासानंतर सचिन जगधाने, रायबा चव्हाण, रवींद्र भोसले, दुर्योधन उर्फ दीपक जाधव आणि नितिन मोरे यांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
आरोपींची पोलिसांनी चौकशी सुरु केली. या चौकशीनंतर त्यांच्याकडून धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी सांगितले की, या पाच दरोडेखोरांनी चोरी करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहिला होता. त्यासाठी ते एका ज्योतिषीकडे गेले होते. त्यानंतर त्यांनी चोरी केली होती. यानंतर आता पोलिसांनी ज्योतिषी रामचंद्र चावा यालाही अटक केली आहे. आरोपींकडून 76 लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.