जळगाव : प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील जळके तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याठिकाणी आज माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले या शाळेत पटसंख्येनुसार १२० विद्यार्थी आहेत परंतु या शाळेत मागील पटसंख्येनुसार ६० गणवेश प्राप्त झाले होते त्यामुळे उर्वरित विद्यार्थी गणवेशापासुन वंचित राहतील अशी खंत येथील शिक्षक कर्मचारी यांना वाटत होती ही बाब जळके वि.वि.का.सोसायटी सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या लक्षात आली व त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य पवन भाऊ सोनवणे यांना विनंती केली व नियमित सामाजिक कार्यासाठी पुढे असणारे पवन भाऊ सोनवणे यांनी उर्वरित विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून दिले
या गणवेश वाटप कार्यक्रमासाठी अध्यक्ष स्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील हे होते त्यांच्या सोबत जळगाव जिल्हा दुध संघाचे संचालक रमेश पाटील ,जळगाव तालुका आत्मा समितीचे अध्यक्ष पी.के.पाटील, जळके वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन प्रविण पाटील,वसंतवाडी ग्रा.प.चे माजी उपसरपंच गजमल पवार ,जळके वि.का.सोसायटीचे सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण, शालेय शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष भंगु चव्हाण, उपाध्यक्ष भुरा चव्हाण उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका सौ पूर्णिमा भामरे यांनी केले कार्यक्रमाच्या ठिकाणी रमेश पाटील व प्रविण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.भारती सोनार, शिक्षिका सौ. पूर्णिमा भामरे, श्रीमती वनमाला हतकर, अंगणवाडी सेविका सौ.कमल चव्हाण, मदतनीस सौ.निर्मला सोनार तसेच गावातील नागरिक उपस्थित होते . कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भारती सोनार यांनी आभार व्यक्त केले