• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पुणे होत आहे दहशतवाद्यांचे केंद्र ? पालकमंत्र्यांनी दिली कबुली !

editor desk by editor desk
August 22, 2023
in राजकारण
0
पुणे होत आहे दहशतवाद्यांचे केंद्र ? पालकमंत्र्यांनी दिली कबुली !

पुणे : वृत्तसंस्था

 

गेल्या महिन्यात पुणे शहरातून पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली असल्याची घटना ताजी असतांना त्यापूर्वी मुंबई अन् पुणे शहरात ३ जुलै रोजी काही जणांना अटक केली होती. यानंतर पुणे शहर दहशतवाद्यांचे केंद्र झाले की काय? अशी प्रकरणे उघड होऊ लागली. दहशतवादी प्रकरणाचा तपास एटीएस आणि एनआयएने केला. त्यानंतर आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रथमच या प्रकरणावर जाहीरपणे मत मांडले. पालकमंत्र्यांनी पुणे शहरात दहशतवाद्यांची साखळी कार्यरत असल्याची कबुली दिली.

इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशवादी संघटनांशी पुण्यातील दहशतवाद्यांचे संबंध समोर आले आहे. तसेच हे दशतवादी स्टुडंट इस्लामिक मुव्हेमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सिमी आणि इंडियन मुजाहिदीन या बंद पडलेल्या संघटनांचे पुनर्जीवन करत होते, हे तपासातून समोर आले आहे. या संघटनांना विदेशातून फंडीग मिळत आहे. इसिसचा हँडरल त्यांना हँडल करत असलल्याचे तपासातून समोर आले होते. मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साकीब नचान हा या प्रकरणात महत्वाचा दुवा उघड झाला आहे. पुणे शहरातील दहशतवादी प्रकरणाचा तपास सुरुवातील एटीएसने केले. त्यानंतर या प्रकरणाची गांभीर्य ओळखून एनआयएने तपासाची सूत्रे हाती घेतली. एनआयएने कोंढवा परिसरात दोन ते तीन वेळा छापाही टाकला. या छाप्यात दहशवाद्यांची प्रयोगशाळाच सापडली. त्यात बॉम्ब बनवण्याचे साहित्य होते. तसेच अनेक आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले होते.

पुणे शहरात दहशतवाद्यांची मोठी साखळी आहे. या संदर्भात मला माहिती जाहीर करण्यास मर्यादा आहेत. परंतु पुण्यात अतिरेक्यांची मोठी लिंक सापडली आहे. मी कमी बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपणास सर्वांना हदरा बसेल, आपली झोप उडेल, अशी मोठी लिंक दहशतवाद्यांची आहे. या दहशतवाद्यांचे धागेदोरे कुठे कुठे जात आहेत, ते जाहीरपणे सांगण्यास मर्यादा आहेत. पोलिसांनी त्यांना पकडले. त्यावेळी त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. तिसरा साथीदार फरार झाला. परंतु दोघांना पोलिसांनी पकडले. या संदर्भात तपासातून उघड झालेल्या माहितीमुळे आपली सर्वांची झोप उडेल, अशी ही साखळी आतापर्यंत तपासातून उघड झाली आहे.

Tags: #puneChandrakant patildahashatvad Kendra
Previous Post

पाडळसरे धरणावर आढळून आला मृतदेह : अमळनेरात खळबळ !

Next Post

श्रावण सोमवारी महिला जात होती दर्शनाला अन घडले ते हृदयद्रावक !

Next Post
श्रावण सोमवारी महिला जात होती दर्शनाला अन घडले ते हृदयद्रावक !

श्रावण सोमवारी महिला जात होती दर्शनाला अन घडले ते हृदयद्रावक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group