Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विवाहितेच्या चारचाकीचा झाला अपघात पण गाठले परीक्षा केंद्र अन घडले ते धक्कादायक !
    जळगाव

    विवाहितेच्या चारचाकीचा झाला अपघात पण गाठले परीक्षा केंद्र अन घडले ते धक्कादायक !

    editor deskBy editor deskAugust 22, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून अनेक तरुण व तरुणीसाठी तलाठी भरतीची परीक्षा घेण्यात आली होती. पण अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्यामुळे तलाठी भरतीची परीक्षा तब्बल दोन तास पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे बाहेर जिल्ह्यातून आलेला विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. जळगाव शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी सकाळी नऊ वाजता तलाठी भरतीचा पहिला पेपर होता. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे हा पेपर साडेअकरा वाजता सुरू झाला. त्यामुळे परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले असून पुढील सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा दुपारी साडेबारा ऐवजी दुपारी अडीच वाजता होणार आहे.
    दरम्यान, तलाठी भरती परीक्षेसाठी नंदुरबार तसेच जळगाव-मध्य प्रदेश सीमेवरील आणि विविध जिल्ह्यामधून विद्यार्थी हे वेळेवर दाखल झाले होते. मात्र, या ठिकाणी त्यांना सर्व्हर डाऊनच असल्याचे अडचण सांगून पेपर उशिराने सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.सर्व्हर डाऊन मुळे तब्बल दोन तास ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे रात्री साडेआठ वाजेपर्यंत या परीक्षा सुरू राहणार आहेत. त्यामुळे परीक्षा देऊन घरी जाणाऱ्या विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होणार आहे.

    परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कुठलीही बसण्याची व्यवस्था नसल्याने उमेदवारांनी प्रचंड रोष व्यक्त केला. तसेच आमचा जो वेळ वाया गेला याला जबाबदार कोण असाही प्रश्न या ठिकाणी तरुण तरुणी तसेच परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांनी उपस्थित केला आहे आहे. एका विवाहितेचा तलाठी भरती परीक्षेसाठी येत असताना रस्त्यात अपघात झाला. मात्र, यानंतरही अपघातग्रस्त चारचाकी जागेवरच सोडून दुसऱ्याची दुचाकी घेऊन त्यांनी वेळेत परीक्षाकेंद्र गाठले. मात्र आता त्यांना या ठिकाणी तब्बल दोन तास उशिराने पेपर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आल्याने यावेळी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

    #accident #jalgaon Exam
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.