धरणगाव लक्ष्मण पाटील: सोनवद रस्त्यावरील स्मशानभूमीतील बंद खोलीत दारूच्या बाटल्या, झोपण्यासाठी गादी आणि कंडोमची पाकिटं आढळून आल्यानंतर या ठिकाणी वासनाकांड घडलंय का?, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर गावात प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता पालिका प्रशासनने संबधित मक्तेदाराला नोटीस बजावली कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहे.
या संदर्भात अधिक असे की, सोनवद रोडवरील स्मशाभभूमीत एका खोलीत दारूच्या बाटल्या, गादी, ताट, तांब्या, कंडोमचे पाकिट, तेलाचे डबे, ग्लास, एका पिशवीत कांदे, इतर पदार्थ आणि काही दुचाकी गांड्या नंबर प्लेट आढळून आल्या होत्या.
मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत ज्या मक्तेदाराकडे या स्मशानभूमीच्या देखरेखीचे काम दिले होते. त्या मक्तेदाराला १६ तारखेला नोटीस दिली आहे. तसेच त्यांनाच याबाबत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. दरम्यान, मक्तेदाराने या प्रकरणी दिरंगाई केल्यास त्याच्याच विरुद्ध पालिका गुन्हा दाखल करेल, असा सज्जड इशारा देखील मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी दिला आहे.
दुसरीकडे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी पालिका प्रशासनाला घटनेबाबत माहिती दिली असल्याचे सांगितले. तसेच तक्रार द्यायला पालिका कर्मचारी आले होते. परंतू तांत्रिक चूक राहिल्यामुळे ते अर्ज परत घेऊन गेले होते. पालिका प्रशासनाने तक्रार पाठविल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही पो.नि. शेळके यांनी सांगितले.
मुख्याधिकारी यांनी नागरिकांना केले आव्हान
नागरिकांनाही आव्हान आहे आपल्या शहराच्या चारी बाजू स्मशानभूमी आहेत या सार्वजनिक मालकीच्या आहेत त्यामुळे शहराचे सुजाण नागरिक या नात्याने आपणही अशा ठिकाणी काही अवैध गोष्टी घडत असतील तर तात्काळ आमच्या निदर्शनास आणावे ही विनंती. यापुढे नगर परिषदेमार्फत सदर ठिकाणी नियमित गस्त घालण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी सांगितले आहे.