अमळनेर शहरात चोरीच्या घटनेत नियमित वाढ होत असतांना दिसत आहे. शहरातील एका परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अनोळखी चोरट्यानी घरात प्रवेश करून रोकड व दागिने चोरून घराच्या शेजारी अंगणात लावलेली १५ हजार किमतीची दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील शास्त्रीनगर रहिवासी नितीन भालचंद्र पवार यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्याने ७ हजार रोख आणि ३ हजार रुपयांचे दागिने चोरून नेत त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या माधवराव बडगुजर यांची १५ हजार किमतीची दुचाकी क्रमानं एम एच १९- ७९१८ चोरून नेली . याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोना घनशाम पवार करीत आहे.