Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सोशल मिडीयावर शोधली मैत्रीण अन अडकला !
    क्राईम

    सोशल मिडीयावर शोधली मैत्रीण अन अडकला !

    editor deskBy editor deskAugust 20, 2023Updated:August 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

     

    गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक तरुण-तरुणी सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतात पण चाळीशी पार केलेले अनेक जण सोशल मीडियावर मैत्रीणी शोधत असल्याने पुणे शहरातील ४६ वर्षीय व्यावसायिकाने अशीच मैत्रीण शोधली. मग दोघांमध्ये चॅटींग सुरु झाले. त्यामध्ये तो व्यावसायिक तिच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. दोघांमधील संवाद प्रेमाचे होत होते. मग तिने त्याला पुण्यातील वारजे भागातील हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवले. हॉटेलमध्ये गेल्यावर जे घडले, त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला.

    काय घडली घटना ?

    पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवासी असणाऱ्या ४६ वर्षीय व्यावसायिकाबाबत हा प्रकार घडला आहे. त्याने फेसबुकवरुन मनिषा नावाच्या मुलीशी मैत्री केली. ‘मनिषा जी’ नावाने तिचे फेसबुक अकांउट होते. दोघांमध्ये संभाषण होत होते. परंतु ते बनावट खाते होते. तिने त्या व्यक्तीला पूर्णपणे हनी ट्रॅपमध्ये फसवले. कारण दोघांमध्ये प्रेमाचे संवाद होत होते. त्या बनावट खात्यातील मनिषाने त्याच्याशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. वारजे भागात असलेल्या एका हॉटेलवर ही भेट १६ ऑगस्ट रोजी ठरली. ठरलेल्या वेळेस व्यावसायिक तिला भेटायला गेला पण भलताच प्रकार घडला.

    व्यावासायिक हॉटेलमध्ये गेल्यावर दोन जण त्याच्याजवळ आले. आपण सायबर पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही एका मुलीला फसवत आहात, अशी तक्रार आली आहे. तुम्ही महिलांचे व्हिडिओ आणि फोटो काढले आहेत की नाही? हे तपासायचे आहे. यामुळे आमच्यासोबत चला, असे सांगितले. यानंतर दोन्ही आरोपींनी त्या व्यक्तीला एटीएममध्ये नेले.

    एटीएममधून ५३ हजार ५०० रुपये काढण्यास भाग पाडले. त्यानंतर पैसे घेऊन ते घटनास्थळावरून पसार झाले. आपण सायबर ठगांच्या जाळ्यात फसल्याचे त्या व्यावसायिकाला लक्षात आले. त्यानंतर त्याने पोलिसात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 392, 420, 506, 170, 384, 34 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

    #police Crime Honey trap
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पुणे जमीन घोटाळा : पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही? दमानियांचा थेट सवाल

    December 22, 2025

    बांगलादेशात राजकीय हिंसाचार वाढला : नेत्यावर घरात घुसून गोळीबार

    December 22, 2025

    जळगाव : धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

    December 22, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.