Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रत्येक गणात जाऊन जागेवरच समस्या सोडवू : जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील
    जळगाव

    प्रत्येक गणात जाऊन जागेवरच समस्या सोडवू : जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील

    editor deskBy editor deskAugust 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

     

    मंत्री महोदय ना. गुलाबराव पाटील यांना तीन दिवस मुंबईत मंत्री मंडळाच्या बैठकांना हजर रहावे लागते. त्यामुळे मंत्र्यांची भेट घेणे नागरीकांना शक्य होत नाही. परंतु, आता प्रत्येक गणात बैठक घेऊन नागरीकांच्या समस्या जागेवरच सोडवल्या जातील. त्यासाठी तलाठी, तहसिलदार, प्रांत यांनाही गावातच बोलावून घेऊ, अशी हमी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी आज दिली. वावडदा येथे झालेल्या पंचायत समिती गण संपर्क बैठक या अभियानाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

     

    या अभियानांतर्गत मंत्री महाेदयांनी गेल्या चार वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती बॅनर, माहिती पुस्तीकेच्या स्वरुपातून नागरीकांपर्यंत पोहोचवण्याची विनंती प्रतापराव पाटील यांनी केली. वराड गावातील स्मशानभुमीचे वॉल कंपाऊंड व शिवरस्ता म्हसावद गावातील पाणी पुरवठा, पिक कर्ज, वसंतवाडी ते रामदेववाडी व वसंतवाडी ते विटनेर या भागातील शेतरस्त्यांचे वाद मिटवण्यासाठी पुढकार घेण्यात येईल. मुस्लीम कब्रस्तानसाठी बीडीओशी बोलून लागलीच निधी उपलब्ध करुन दिला जाईल. यासह अनेक वैयक्तीक तक्रारींवर तोडगा काढण्याच्या उद्देशाने प्रतापराव पाटील यांनी उपाय-योजना सुचवल्या. मंत्री महोदय ना. गुलाबराव पाटील यांनी ९८ टक्के निधी खर्च केला असून यापुढे देखील अशाच प्रकारे जनतेच्या कामासाठी तत्पर असण्याची ग्वाही दिली. गण गण संपर्क अभियानातून नागरीकांच्या समस्या सुटून चांगला प्रतिसाद मिळेल असेही त्यांनी सांगीतले. जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांनी कार्यकर्त्यांनी पक्षाचा आणि गावातील विकास कामांचा प्रचार करायला हवा. विरोधक खोट्या बातम्या पसरवत असतांना आपल्या पक्षातील प्रत्येक माणसाने याला विरोध करत सत्य परिस्थिती सांगायला हवी असे आवाहन केले. कार्यक्रमास धनंजय सोनवणे, शिवराज पाटील, नानाभाऊ सोनवणे, रमेश आप्पा पाटील, अर्जुन पाटील, माजी उपसभापती समाधान चिंचोरे, शितल चिंचोरे, तालुका प्रमुख अजय महाजन, म्हसावदचे सरपंच गोविंद पवार, अनिल भोळे, सामाजिक कार्यकर्ते रवि कापडणे, अनिल पाटील, माधवराव सोनवणे, प्रकाश काळे, वराडचे उपसरपंच संदीप सुरळकर, पी.के. पाटील, शिरसोली माजी सरपंच अनिल पाटील, राजू चौधरी, चेअरमन बबन शिरसोली उपस्थित होते.

    Gulabrav patil prataprav patil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई आमचीच : ठाकरेंच्या विधानाने चर्चेला उधान !

    November 15, 2025

    तीन दुचाकीसह चोरटा पारोळा पोलिसांच्या ताब्यात !

    November 15, 2025

    “जो जीता वही सिकंदर : फडणवीसांचा शरद पवारांना करारा टोला !

    November 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.