धरणगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी धरणगाव व अमळनेर स्टेशन अमृत भारत स्कीम अंतर्गत मंजूर केल्याबद्दल मंत्री यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे व्यक्त केले आभार व विविध मागण्यांविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली. भारतीय जनता पार्टी,धरणगाव/ अंमळनेर तालुका व रेल्वे सल्लागार समिती,यांनी रेल्वे विषयी सुचविलेल्या विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना DRUCC मेंबर श्री प्रतिक जैन यांचेकडून देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, भारतीय जनता पार्टी,धरणगाव/ अंमळनेर तालुका रेल्वे सल्लागार समिती,यांनी रेल्वे विषयी सुचविलेल्या विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना शासकीय दौऱ्या दरम्यान जळगाव येथे निवेदन देण्यात आले.
1. भुसावळ ते पुणे वाया धरणगाव -अमळनेर -नंदुरबार – पुणे नवीन गाडी सुरू करणेबाबत…
2. सुरत भुसावल पॅसेंजर यांच्या वेळेत बदल करणे बाबत..
3. धरणगाव येथे ताप्ती गंगा एक्सप्रेस, बरोनी एक्सप्रेस, हिसार सिकंदराबाद एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळण्याबाबत
4. अमळनेर व धरणगाव स्टेशन अमृत भारत योजनेअंतर्गत प्लान विषयी सूचना
5. अमळनेर येथे प्रेरणा एक्सप्रेस व चेन्नई जोधपूर एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळणे बाबत..
अशा विविध मागण्यांचे निवेदन मा रेल्वे राज्य मंत्री श्री.रावसाहेबजी दानवे तसेच पश्चिम रेल्वे डी आर एम श्री. नीरज वर्मा यांना देण्यात आले तसेच जळगाव रेल्वे स्थानक येथे भेटी दरम्यान सकारात्मक चर्चा होऊन वरील मागण्यांविषयी आश्वासन ही देण्यात आलेले आहे
धरणगाव व अमळनेर स्टेशन अमृत भारत योजनेअंतर्गत विकसित होणार आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टी, खासदार श्री. उन्मेष दादा पाटील,धरणगाव व अमळनेर रेल्वे सल्लागार समिती व DRUCC मेंबर श्री.प्रतीक जैन यांनी माननीय मंत्री श्री. रावसाहेबजी दानवे तसेच खान्देशातील तमाम जनतेने आभार व्यक्त केले.