नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात रात्री तर चालतोच पण दिवसा देखील देह व्यापार सुरु असल्याची घटना गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये स्पा च्या आडून सुरू असलेल्या देह व्यापारावराचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कारवाईदरम्यान पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश मधील तीन महिला आणि तीन युवतींची पोलिसांनी सुटका केली. या देहव्यापार प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपूरचा सदर हा परिसर नामांकित परिसर असून, या ठिकाणी स्पाच्या आडून देह व्यापाराचा सर्रास धंदा सुरू होता. वेगवेगळ्या राज्यातील युवती आणि महिलांना आमिष दाखवून या ठिकाणी आणलं जायचं आणि त्यांच्याकडून देह व्यापार करून घेतला जायचा. या स्पा चा मालक हा मुंबईचा रहिवासी असून, तो नागपुरात हा व्यवसाय चालवत होता.
सदर परिसरातील या स्पामध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या देहव्यापारासाठी वेगवेगळ्या राज्यातील मुली आणि महिला आणण्यात येत होत्या. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्लॅनिंग करत डमी ग्राहक त्या हॉटेलच्या स् मध्ये पाठवला. सगळा व्यवहार फिक्स केला आणि त्या ठिकाणी धाड टाकत कारवाई केली.
कारवाई दरम्यान अनेक आक्षेपार्ह वस्तू या ठिकाणी पोलिसांना मिळून आल्या. त्याचप्रमाणे तीन मुली आणि तीन महिला सुद्धा या ठिकाणी दिसून आल्या. या महिला आणि मुली पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश मधील असल्याचे पुढे आलं या महिलांची आणि मुलींची सुटका करून पोलिसांनी स्पा चा मॅनेजरसह दोन जणांना अटक केली. सदर सारख्या पॉश वस्तीमध्ये हा व्यवसाय बिनधास्त सुरू असल्याने चर्चांना उधाण आले आहे. तसेच या ठिकाणी येणारे कस्टमर हे नियमित स्वरूपाचे आणि ओळखीचे असायचे. त्यामुळे बाहेर माहिती जाण्याची भीती कमी होती, मात्र आता यांच बिंग फुटलं आहे.