जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात बसच्या अपघाताची जणू मालिका सुरु आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पहूर येथील रेल्वे क्रॉसिंग जवळ समोरून येणाऱ्या कंटेनरने जामनेर कडे जाणाऱ्या एसटीला समोरून जोरदार धडक दिली. यात बस चालकाला दुखापत झाली असून त्यांच्यावर जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास पैठण आगाराची पैठण भुसावळ बस (क्र. एमएच २० बीएल ३९०१) पहूरकडून जामनेरकडे जात होती. तेव्हा रेल्वे क्रॉसिंग जवळ जामनेरकडून पहूरकडे भरधाव येणाऱ्या कंटेनरने ( क्र. एचआर ३८ एबी ९२३५) एसटीला जोरदार धडक दिली. यात बसचे चालक ए. व्ही. बढे यांच्या कमरेला व पायाला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने बसमधील प्रवास्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. बसचालक बढे यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.