ठाणे : वृत्तसंस्था
नवरा बायको यांचे नाते खूप प्रेमाचे असते पण काही काही कारणाने ते इतक्या टोकाला पोहचत असते कि त्यातून काय घडेल हे कुणाला सांगता देखील येत नाही अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. बायकोने नवऱ्यासाठी भात शिजवला नाही. म्हणून पतीने पत्नीला मरेपर्यंत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे खोणी गावातुन एका चाळीतून आरोपीला अटक केली आहे. आरोपी २३ वर्षीय रद्दी व्यापारी आहे. त्याचे नाव शंकर वाघमारे असे आहे. वर्षभरापूर्वी 20 वर्षीय ज्योत्स्नाशी शंकरने लग्न केले होते. हे दाम्पत्य भिवंडीत राहत होते. मंगळवारी आरोपीने पत्नीवर लाकडी दांडक्याने हल्ला करत तिचा खून केला. निजामपुरा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अतुल लांबे यांनी सांगितले की, आरोपी मंगळवारी घरी गेला आणि भात न शिजवल्याने पत्नीशी वाद घालू लागला. दोघांमध्येभांडण झाले यावेळी पत्नीचा मृत्यू होईपर्यंत त्याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. शेजाऱ्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला पण तोपर्यंत उशीर झाला होता आणि ज्योत्स्ना यांचा रक्तबंबाळ होऊन मृत्यू झाला होता.