जळगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे बनावट नोटा चलनात आणायच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन जणांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आणि न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी विजय प्रकाश बडगुजर (रा. पिंप्री खुर्द) यांच्या फिर्यादीवरून प्रवीण नंदलाल जयस्वाल (वय २६ राखांडवा), शरद जाखेडे (वय ४१, रा. जळगाव) तसेच शिव किशोर ब्राह्मणे (वय २६, रा. इंदूर, मध्य प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन धरणगाव न्यायालयात हजर केले असता, धरणगाव न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील करीत आहेत.