Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव जिल्ह्यातुन दोन गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध !
    क्राईम

    जळगाव जिल्ह्यातुन दोन गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध !

    editor deskBy editor deskAugust 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

     

    जळगाव जिल्ह्यात अनेक दिवसापासून नियमितपणे गुन्हेगारी घटना घडवून आणणाऱ्या विरोधात जळगाव पोलीस दलाने कारवाईचा धडाका सुरु केला असून जिल्ह्यातील दोघांना पुन्हा एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आल्याने गुन्हेगार धास्तावले आहेत. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका पोलिस स्टेशन आणि चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीतील दोघांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.

     

    मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विविध गुन्हे दाखल असलेला इब्राहीम उर्फ टिपू उर्फ टिप्या साततार मण्यार (रा.वराडसीम, ता.भुसावळ) आणि आकाश संतोष भोई (रा. साने गुरुजी वसाहत चोपडा) यांना स्थानबद्ध करण्यात आले आह.े इब्राहीम उर्फ टिपू याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला तीन, फैजपूर आणि शनीपेठ पोलिस स्टेशनला प्रत्येकी एक तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनला दोन असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आहेत. तरीदेखील त्याच्या वर्तणूकीत बदल न झाल्याने पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्यामार्फत तो जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आला. संशयिताची येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे रवानगी करण्यात आली.

     

    चोपडा शहरातील आकाश संतोष भोई याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला सहा आणि अमळनेर पोलिस स्टेशनला एक असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. याशिवाय चोपडा शहर पोलिस स्टेशनला अदखलपात्र दोन गुन्हे दाखल आहेत. चोपडा शहर पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध पाच वेळा प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आहेत. संशयिताची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. या कारवाईकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या सह त्यांचे सहकारी आणि संबंधित पोलिस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले.

    #jalgaon Crime MPDA
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पुणे जमीन घोटाळा : पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही? दमानियांचा थेट सवाल

    December 22, 2025

    बांगलादेशात राजकीय हिंसाचार वाढला : नेत्यावर घरात घुसून गोळीबार

    December 22, 2025

    जळगाव : धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

    December 22, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.