धरणगाव ; प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील पाळधी गोमांसची वाहतूक करत असल्याच्या संशयातून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याची घटना बायपास परिसरात गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून दंगा नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले होते.
काय घडला प्रकार
बांभोरी पेट्रोलपंपा नजीक उग्र वास येत असल्याने नागरिकांना एक ट्रकची तपासणी केली असता यात कातडी व हाडांचे असल्याचा प्रकार आढळून आला. यानंतर काही नागरिकांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. यानंतर हा ट्रक पोलिसांनी पाळधी बायपास जवळील एका गोडावूनमध्ये लावण्यासाठी आणण्यात आला. त्यावेळेस ट्रकमधून कातडी व हाडांचे नमुने घेवून परीक्षणासाठी पाठविण्यात आले. ट्रक गोडावूनमध्ये लावण्याआधीच संतप्त जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करीत ट्रक जाळला. यांनतर परिस्थिती हाताबाहेर जात असताच पोलिसांनी दंगा नियंत्रण पथक देखील घटनास्थळी मागविण्यात आले होते. हि घटना रात्री रात्री ११ वाजेपासून सुरु झालेला वाद पोलिसांनी केवळ अर्ध्या तासात नियंत्रणात आणला. यावेळी घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, उपविभागीय अधिकारी संदीप गावित, ऋषिकेश रावले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, आप्पासाहेब पवार, धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.


