Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ : प्रा.डॉ.बोरसेंचे आमरण उपोषण आजपासून सुरु !
    जळगाव

    जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ : प्रा.डॉ.बोरसेंचे आमरण उपोषण आजपासून सुरु !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 17, 2023Updated:August 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यायातील भ्रष्ट कारभाराला करणार उघड

    जळगाव जिल्ह्यातील एका महाविद्यालयाच्या घटनाबाह्य व भ्रष्ट कारभारासंदर्भात प्रा.डॉ.प्रविण बोरसे यांनी आज पासून जळगाव शहरातील सह संचालक उच्च शिक्षण विभाग जळगाव यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केल्याने जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

    त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे कि, धरणगाव येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यायातील विविध घटनाबाह्य व भ्रष्ट कारभारासंदर्भात जानेवारी २०२० मध्ये महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रविण बोरसे यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पुराव्यासह केलेल्या तक्रारी संदर्भात प. रा. हायस्कूल व्यवस्थापन मंडळ, धरणगाव आणि जळगाव विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने तत्कालीन प्राचार्य बिराजदार यांना चौकशी समितीने दोषी ठरवलेले असतानाही क्लिनचीट देऊन अभय दिल्याबद्दल १७ ऑगस्ट २०२३ पासून डॉ. बोरसे आमरण उपोषणास बसत आहेत. २०१२ पासून महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. डॉ. प्रविण बोरसे यांनी महाविद्यालयातील घटनाबाह्य व भ्रष्ट कारभाराच्या तक्रारी विविध स्तरावर केल्यामुळे त्यांच्यावर तत्कालीन प्राचार्याकडून लेखी स्वरूपात लैंगिक शोषणाचे खोटे आरोप करून जीवनातून उठविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

    डॉ. बोरसे यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र शासनच्या आदेशानुसार विद्यापीठाने पाच सदस्यीय जाधव समितीमार्फत विद्यापीठाने अहवाल मागविला. सदर अहवालावर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेमध्ये चर्चा होऊन पुन्हा उप- समिती नियुक्त केली. या समितीने जाधव समितीच्या अहवालाच्या विपरीत, “सदर तक्रारीसंदर्भात आपण केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नाही” असा ठराव पारित करून भ्रष्टाचारावर पांघरून घालीत दोषींना बळ दिल्यामुळे भ्रमनिरास झालेल्या डॉ. बोरसेंनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. यासंदर्भात डॉ. बोरसेंनी न्यायालयातही धाव घेतलेली असून न्यायालयाने भा.द.सं. २०२ नुसार चौकशीचे आदेशही पारित केलेले आहेत. वरील घटनाक्रमावरून धरणगाव दिवाणी न्यायालयाची भा.द.सं. २०२ ची चौकशी प्रलंबित आहे, युजीसीचे डॉ. बिराजदार यांच्या अवैध संपत्तीच्या चौकशीचे विद्यापीठाला दिलेल्या आदेशाची कार्यवाही व्हायची आहे, विद्यापीठ तक्रार निवारण समितीने दिलेल्या चौकशीच्या आदेशाची अंमलबजावणी प. रा. हायस्कूल सोसायटी संस्थेने अद्याप केलेली नाही तसेच गंभीर बाब म्हणजे संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, पुणे यांनी उप- संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, नाशिक यांना दिलेल्या आदेशानुसार चौकशी होणे बाकी आहे. या सर्व चौकशी प्रलंबित असताना सदरील संस्थेने प्राचार्य डॉ. बिराजदार यांच्या पेन्शन प्रस्तावासोबत “कोणतीही चौकशी प्रलंबित नाही” असे ना हरकत प्रमाणपत्र दिले व त्याआधारे डॉ. बिराजदार यांना नियमबाह्यपणे पेन्शन मंजूर झालेले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    धरणगांव : दहा हजारांची लाच घेताना अभियंता अटकेत !

    December 4, 2025

    विषबाधा झाल्याने ४७ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.