Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भररस्त्यात ड्रायव्हरला बेदम मारहाण ; सई पुन्हा आली चर्चेत !
    राज्य

    भररस्त्यात ड्रायव्हरला बेदम मारहाण ; सई पुन्हा आली चर्चेत !

    editor deskBy editor deskAugust 17, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

     

    मराठी चित्रपटसृष्टीत नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री सई ताम्हणकर हि जरा वेगळ्या कारणाने सध्या चर्चेत येत आहे. सईच्या ड्रायव्हरला भर रस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार मुंबईतील मालाड येथील मालवणी परिसरात घडला आहे. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

    तिच्या ड्रायव्हरला चक्क बेल्ट आणि बांबूने बेदम मारहाण केली गेली आहे. त्याला झालेल्या मारहाणीनंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. सईच्या ड्रायव्हरने घडलेल्या घटनेनंतर पोलिसांत धाव घेत मारहाण केलेल्या चार जणांविरोधात एफआयआर दाखल केली आहे.

    दरम्यान, याबाबत माहिती अशी की, ड्रायव्हरने सतत हॉर्न वाजवल्याने दुकाचीवर असलेल्या चार जणांनी सईच्या ड्राइव्हरला गाडीतून खाली खेचून मारहाण केली. तरूणांनी बेल्ट आणि बांबूच्या काठीने सद्दाम याला मारहाण केली. सद्दाम असे सईच्या ड्रायव्हरचे नाव आहे. सईचा ड्राइव्हर हा मालवणी परिसरात जात असताना काही तरूण झिगझॅग पद्धतीने रस्त्यावर दुचाकी चालवत होते. मारहाण होत असताना त्याला सोडवण्यासाठी आलेल्या दोघांनाही तरुणांनी मारहाण केली आहे.

     

    सद्दाम मंडल हे अनेक वर्षांपासून सईकडे वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत. १३ ऑगस्ट रोजी हा सगळा प्रकार घडला आहे. ही घटना रात्री १० वाजता घडली. पोलिसांनी या हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ती आपल्या चित्रपटांमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. आता ती या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. यामुळे तिची चर्चा सुरू आहे.

    driver marhan Sai tamhankar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.