लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शहरातील विविध ठिकाणी विना परवानगी बॅनर लावल्याप्रकरणी दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. यात नऊ जणांविरुध्द मनपातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुबचंद साहित्या यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी मनपा अधिकारी धजावत नव्हते. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते दिपक गुप्ता यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री खुबचंद साहित्या यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील विविध रस्त्यांवर विना परवानगी बॅनर लावण्यात आले होते. या बॅनर विरुध्द मनपाच्या अतिक्रमण पथकाकडून कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण पथकातील लिपिक युवराज भानुदास नारखेडे यांचे फिर्यादी वरून महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा कलम ३,७ अनव्ये जिल्हापेठ पो.स्टे येथे अवैध बॅनर लावणारे चेतन किशोर शिंपी रा.चंदू अण्णा नगर जळगाव, निलेश संजय जोशी (सिटी ब्रेन प्लेन, बहिणाबाई चौक जळगाव), सुनील विजय देशमुख जळगाव(युनिक अकादमीचे बोर्ड आकाशवाणी चौक), अनिलकुमार चेतनदास हेमनानी जळगाव (विजय फॅशनचे बॅनर खाँजमिया चौक जळगाव) यांचेवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. तर, लिपिक युवराज भानुदास नारखेडे यांच्याच फिर्यादीवरुन रामानंद नगर पोलिस स्टेशनला कुणाल किशोर पांडे, रेखा पाटील, संजय कापसे व सुनिल देशमुख यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खुबचंद साहित्या यांनी देखील गोविंदा रिक्षा स्टॉप ते शास्त्री टॉवर रस्त्यावर खा. संजय राऊत यांच्या वाढदिवसाचे विना परवानगी बॅनर लावले होते. त्यामुळे पोलिस कर्मचारी नरेंद्र ठाकरे यांच्या फियादीवरुन खुबचंद प्रेमचंद साहित्या यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रिंटींग प्रेस मालकावरही होणार गुन्हा दाखल
यापुढे जळगाव शहरात महानगरपालिकेची कायदेशीर परवानगी घेऊनच बॅनर लावावे तसेच बॅनर तयार करणाऱ्या प्रिंटिंग प्रेसने सुद्धा परवानगी मिळाले वर ती पावती पाहुनच बॅनर तयार करावे व बिना परवानगी कोणत्याही प्रिंटिंग प्रेस ने बॅनर छापून देऊ नये अन्यथा,संबंधित प्रिंटिंग प्रेसचे मालकावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा मनपा अधिकाऱ्यांनी दिला.