Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तीन दिवसापासून महिला कर्मचारी बेपत्ता ; गूढ मात्र कायम !
    राज्य

    तीन दिवसापासून महिला कर्मचारी बेपत्ता ; गूढ मात्र कायम !

    editor deskBy editor deskAugust 17, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कल्याण : वृत्तसंस्था

     

    राज्यातील अनेक अल्पवयीन मुलीसह विवाहितांना पळवून नेण्याच्या घटना ताजी असतांना कल्याणमध्ये एक नवीन प्रकरण समोर आले आहे. गेल्या तीन दिवसापासून ड्युटीवर गेलेली महिला पोलीस कर्मचारी बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात मिसिंगची तक्रार देण्यात आली आहे. तीन दिवस उलटून शोध लागत नसल्याने कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेत महिला पोलीस कर्मचारी श्वेता सरगिरे वय २४ असे बेपत्ता महिलेचे नाव असून बाजारपेठ पोलिसांकडून तीन पथक तयार करत महिला पोलिसाचा शोध सुरु आहे. महिलेची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.

     

    नवी मुंबई पोलीस दलात कल्याण पश्चिमेला राहणारी श्वेता सरगिरे ही महिला कार्यरत असून सोमवारी नेहमीप्रमाणे महिला आपल्या ड्युटीवर जाण्यासाठी घरातून निघून गेली. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. कुटुंबीयांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तिच्याशी संपर्क होत नव्हता. अखेर कुटुंबीयांनी बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत मिसिंगची तक्रार दाखल केली. कुटुंबीयांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल करत शोध सुरु केला.

    बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली. मात्र तीन दिवस उलटले तरी अद्याप महिलेचा थांगपत्ता लागला नाही. पोलीस तपासात महिला गेल्या काही दिवसापासून कामावर गैरहजर राहत असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे महिलेच्या गायब होण्याबाबत गूढ वाढले आहे. दरम्यान, पोलिसांना महिलेला शोधण्यास अद्याप यश आले नसल्याने कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

    बेपत्ता महिला कर्मचारी
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.