जळगाव : प्रतिनिधी
ग्रामस्थांनी गावात स्वच्छता राखून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्यसेवेतून आत्मिक समाधान प्राप्त होत असते. १५ ऑगस्ट पासून सर्व शासकीय रुग्णालयात शासनामार्फत मोफत आरोग्य सेवा पुरविल्या जात आहे. ५ लाखापर्यंत प्रत्येकाला मोफत या आभा कार्ड द्वारे आरोग्य सेवा मिळणार असून आपल्या आरोग्य विषयी माहीती असलेले आभा कार्ड हे प्रत्येक नागरीकांना नवसंजीवनी व आधारवड ठरणार असल्याचे प्रतिपादन स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते नांद्रा बु येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे व आभा कार्डचे वाटप प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख निलेश पाटील हे होते.
ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कानळदा ते रिधुर या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ५ कोटी तसेच नांद्रा ते चांदसर रस्त्यासाठी ५० लाखाचा निधी मंजूर आहे. गावातील तरुणांनी केलेल्या मागणी नुसार साहित्यासह व्यायामशाळा बांधकाम मंजूर केले असून लवकरच या कामांना सुरुवात करणार असून गावातील ११ स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी स्वातंत्र्यसैनिक भवन नूतनीकरण करण्याची ना.गुलाबराव पाटील यांनी ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आरोग्य शिबिरात आभा कार्डचे केले वाटप
गुलाबरावजी पाटील फाउंडेशन व मुक्ती फाउंडेशन आयोजित आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टरां मार्फत सुमारे ३५० रुग्णांची तपासणी करण्यात आली.आरोग्य शिबिरासाठी आर. एल. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व जिल्हा सामान्य रुग्णालय यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना आभा कार्डचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सीए हितेश आगीवाल यांनी गावातील स्वातंत्र्य सैनिक भवन दुरुस्तीचे काम करण्याची मागणी करत नांद्रा गावात पालकमंत्र्यांच्या मार्फत सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती विषद केली. सूत्रसंचालन मनपाचे सेवानिवृत्त अधिकारी राजू पाटील यांनी केले तर आभार मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंदराव गोसावी यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, कैलास पाटील, सरपंच कविताबाई पाटील, उपसरपंच जनाबाई सोनवणे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण , मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी, माजी उपसभापती डॉ. कमलाकर पाटील , रामचंद्रबापू पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, जनाआप्पा कोळी, ग्रा.पं. सदस्य पंकज पाटील, वैशाली बाविस्कर, मीनाताई सोनवणे, पियुष पाटील, युवासेनेचे शिवराज पाटील, गोपाल जिभू पाटील, दिलीप आगीवाल , तुरखेडा विका सोसाचे चेअरमन जितू पाटील, सीए हितेश आगीवाल, संदीप सुरळकर, शिवाजी सोनवणे, भादली, फुपणी, कानळदा व किनोद येथिल सारपंचांसह डॉक्टर, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.