लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दहावी पास असणाऱ्या उमेदवारांनासाठी बीएसएफमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन सुरु झाली आहेत.
बीएसएफ कॉन्स्टेबल भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे . केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सीमा सुरक्षा दल (BSF) ने इंजिनीअरिंग सेटअपमध्ये एएसआय, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, पगार, वयोमर्यादा, अनुभव यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
बीएसएफने प्रसिद्ध केलेल्या (ग्रुप पीसी/२०२१) जाहिरातीनुसार, एकूण ७२ पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी ३२ पदे अनारक्षित आहेत, तर उर्वरित ४० पदे इडब्ल्यूएस, ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत.बीएसएफ ग्रुप सी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १५ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. उमेदवारांना २९ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार बीएसएफची अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रियेचे वेळ नोंदणी, ऑनलाइन अर्ज भरणे आणि परीक्षा शुल्क भरणे असे तीन टप्पे आहेत.
हेड कॉन्स्टेबल (सुतार) – ४ पदे
हेड कॉन्स्टेबल (प्लंबर) – २ पदे
कॉन्स्टेबल (सिव्हरमन) – २ पदे
कॉन्स्टेबल (जनरल ऑपरेटर) – २४ पदे