जळगाव – धुळे महामार्गावर बांभोरीकडून शहरात येत असलेल्या दुचाकीस्वाराला खोटे नगर नजीक असलेल्या हॉटेल साई पॅलेस जवळ बसने जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना १५ रोजी घडली आहे. याप्रकरणी एसटी बस चालकाविरुद्ध जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील द्वारका नगरातील रहिवासी महेश कुमार पाटील हे त्यांची दुचाकी क्रमांक एम एच १९ डि.जे.१४०५ ने बांभोरी येथून घराकडे जात असताना एसटी बस क्रमांक एम एच 40- एन ९८३८ ने सायंकाळी चार वाजेच्या सुमारास धडक दिली या धडकेत महेश कुमार पाटील हे रोडावर खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी गणेश दिलीप पाटील व 39 राहणार स्वामी समर्थ कॉलनी यांच्या फिर्यादीवरून बस चालक आयुब शेख चांद पिंजारी राहणार एरंडोल यांच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास पोहे को भगवान महाजन करीत आहे.