धरणगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पदभार घेतल्यापासून अनेक वाळूमाफियावर मोठा वचक लागला आहे. तर दुसरीकडे महसूल प्रशासन थेट कारवाई करीत असल्याने वाळूमाफियामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
धरणगाव तालुक्यातील मौजे आव्हाणी येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चेसिस क्र QZTM31619084832 हे राहुल रमेश धनगर रा.पाळधी ता धरणगाव यांचे मालकीचे असून सदर वाहन पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे सदरची कारवाई श्री मनिषकुमार गायकवाड उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग यांचे मार्गदर्शनाखाली धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, पाळधी मंडळ अधिकारी अमोल पाटील, भरत पारधी मंडळ अधिकारी धरणगाव समा तडवी पोलीस कर्मचारी यांनी केली आहे