सांगली : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या महिन्याभरापासून अनेक वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एका नव्या वक्तव्याने चर्चेत आले आहे. आज मंगळवारी सांगलीत आपल्या सहकाऱ्यांसह पदयात्रा होती. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
भिडे यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनीच ही पदयात्रा काढल्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. भारताचा राष्ट्रध्वज भगवा करण्याच्या मागणीसाठी यांनी काढली. ‘भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजही भगवा असावा,’ असा त्यांचा युक्तिवाद आहे. भिडे यांच्या धारकऱ्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी यापूर्वीच 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी तिरंगा फडकवणार नाही व राष्ट्रगीतही म्हणणार नसल्याचे स्पष्ट केले होते. संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी सांगलीत हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत संभाजी भिडे यांच्यासह हजारो तरुण सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून, भगव्या ध्वजाला हार प्रदान करून प्रेरणा मंत्राने ही पदयात्रा सुरू झाली. शिवाजी मंडई, मारुती चौक, हरभट रोड, कापड पेठ मार्गे राजवाडा चौक, स्टेशन चौक, बदाम चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर या पदयात्रेची सांगता होणार झाली. संभाजी भिडे हे रॅलीच्या शेवटी एकटेच चालत सहभागी झाल्योच दिसून आले.
भारत हे हिंदू राष्ट्र आहे. त्यामुळे भारताचा राष्ट्रध्वज भगवा करावा, या प्रमुख मागणीसाठी ही पदयात्रा काढण्यात आली. भगवा न राष्ट्रध्वज हे उरी शल्य दुःख ! करणार राष्ट्रध्वज ही शिव आन भाक !! दिल्लीवरी फडकवू भगवा ध्वजाला ! ओलांडू म्लेच्छ वधन्या आम्हीं अटकेला !! राजा बदलतो, राजमुद्रा बदलते पण ध्वज बदलत नाही. श्री शिवछत्रपती – श्री शंभूछत्रपती महाराजांची अपूर्ण इच्छा आकांशा पूर्णत्वाकडे पडणारे पाऊल… भगवा राष्ट्रध्वज असा निर्धार धारकऱ्यांनी व्यक्त केला आहे.