• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन पाळधीचे डॉ.व्ही.आर.पाटील यांची आत्महत्या

editor desk by editor desk
August 15, 2023
in क्राईम
0
तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन पाळधीचे डॉ.व्ही.आर.पाटील यांची आत्महत्या

धरणगाव : प्रतिनिधी 

 

चोपडा तालुक्यात असलेल्या निमगव्हाण येथील तापी नदीच्या पुलावरून पाळधीच्या डॉक्टरांनी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज 15 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्या कोणत्या कारणाने केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून मयत डॉक्टरांची कार पुलावर आढळून आली. दरम्यान त्यांच्या कारमध्ये एक कागद लिहिलेला आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. या कागदावर नेमके काय लिहिले आहे हे अद्याप कळू शकले नाही. दरम्यान डॉक्टर पाटील यांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू असल्याचे कळते.

दलितमित्र डॉ.व्ही .आर .पाटील वय 75 रा.पाळधी ता.धरणगाव असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाळधी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून व्ही .आर .पाटील ओळखले जातात. ते मराठा समाजाचे असून त्यांनी श्रीराम जेष्ठ नागरिक मंडळाची स्थापना केली होती, तसेच संत तुकाराम महाराज पंच मंडळाचेही ते अध्यक्ष होते. पुरोगामी चळवळीचे पुरस्कर्ते असल्याने त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून यात त्यांचा दलितमित्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा राकेश, सून, नातवंडे असा परिवार आहे. पाळधी येथील मेन रोडवर कस्तुरबा नावाचे हॉस्पिटल आहे. दरम्यान त्यांच्या निधनाची वार्ता कळताच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष गोपाळ सोनवणे समता परिषदेचे भूषण महाजन शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख आणि मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानाजवळ मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.

Tags: #policeCrimeMan suicide
Previous Post

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल !

Next Post

शाळेत अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणारा संशयित अटकेत 

Next Post
शाळेत अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणारा संशयित अटकेत 

शाळेत अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणारा संशयित अटकेत 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group