• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
August 15, 2023
in क्राईम, जळगाव
0
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

जळगाव : प्रतिनिधी 

 

सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करीत तिला वारंवार ब्लॅकमेल करण्याच्या प्रकारात इमरान शब्बीर मन्यार (रा. साक्री, जि. धुळे) आणि इकबाल शेख यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका नामांकित महाविद्यालयात एक २० वर्षीय तरुणी शिक्षण घेत आहे. एप्रिल २०२२ मध्ये महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये बसलेली असताना विद्यार्थिनीची एका विद्यार्थ्याशी ओळख झाली. त्यानंतर महाविद्यालय प्रोजेक्ट आणि इतर शैक्षणिक कामानिमित्त दोघे भेटत असताना त्याने विद्यार्थिनीसोबत सेल्फी काढली. जून – जुलै २०२२ मध्ये प्रोजेक्टच्या कामानिमित्त इम्रानने विद्यार्थिनीला तो राहत असलेल्या रामानंद नगर स्टॉप जवळील खोलीवर बोलविले. त्याठिकाणी असलेल्या इम्रानचा मित्र इक्बाल याच्यासोबत ओळख करून दिल्यावर तो निघून गेला. काही वेळाने इम्रानने विद्यार्थिनीसोबत अंगलट करीत सेल्फी काढले. तीन दिवसांनी पुन्हा त्याने विद्यार्थिनीला फोन करून भेटण्यास बोलाविले व फोटो आई-वडील, मित्र मैत्रिणींना आणि इतरत्र व्हायरल करण्याची धमकी देत त्याने जबरदस्ती तिच्यावर अत्याचार केला. ऑगस्ट – सप्टेंबर २०२२ मध्ये पुन्हा त्याने मुलीला फोन करून धमकी देत अजिंठा चौफुली जवळील एका हॉटेलवर भेटण्यास बोलवून विद्यार्थिनीवर अत्याचार केला. त्रास असह्य झाल्याने तरुणीने हा प्रकार मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने तिच्या भावाला प्रकार सांगितल्यावर प्रकार उघड झाला व रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Tags: #jalgaonBlackmailCrime
Previous Post

अडावद पोलीसांची मोठी कारवाई : ११ तलवारीसह ५ संशयित ताब्यात !

Next Post

तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन पाळधीचे डॉ.व्ही.आर.पाटील यांची आत्महत्या

Next Post
तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन पाळधीचे डॉ.व्ही.आर.पाटील यांची आत्महत्या

तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन पाळधीचे डॉ.व्ही.आर.पाटील यांची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group