अडावद पोलीस स्थानकात दि. १३ रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यातील ५ संशयित आरोपीच्या बाबत गोपनीय माहिती अडावद पोलिसांनी मिळाली असता त्यांनी ११ तलवारी, २ धारदार गुप्त्या यासह ५ संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि १३ ऑगस्ट रोजी गुरन 174/2023 आर्म ॲक्ट कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात संशयित आरोपी 1) सागर भगवान महाजन वय 22, रा अडावद 2) राहुल लक्ष्मण ठाकरे वय 19, रां सुटकार 3) राज प्रमोद ठाकुर वय 21 रा लोणी ता चोपडा 4) चिरंजीव रवींद्र भोई वय 19,रा अडावद 5 ) मयूर रामेश्वर कोळी वय 20 रा अडावद याच्याकडून एकूण 11 धारदार तलवारी व 2 धारदार गुप्त्या असे एकूण 13 हत्यारे 13000/- रु की चां मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक एम राजकुमार सो, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सो, सहा पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले सो, यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पो स्टे प्रभारी अधिकारी सपोनि गणेश बुवा, Psi जगदीश कोळंबे पीएसआय चंद्रकांत पाटील सह शरीफ शेख, चालक – पोहवा मुकेश तडवी, ज्ञानेश्वर सपकाळे, पोहवा – सुनील तायडे, नासिर तडवी, पोना -विनोद धनगर,फिरोज तडवी, किरण शिरसाठ, पोशि – सतीश भोई,प्रदीप पाटील, शुभम बाविस्कर, संदीप पाटील,शैलेश माळी,रमिज सैय्यद यांनी केली आहे.