पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक मोठ मोठ्या शहरात शिक्षक घरोघरी जावून शिकवणी घेत असतात. आपल्याकडे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते पवित्र समजले जाते. पण याच शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे. हि घटना पुणे शहरातील मुंढवा परिसरात घडली आहे. एका ४० वर्षीय शिक्षकाने लहान असलेल्या विद्यार्थिनीसोबत नको तो प्रकार केला आहे.
काय घडली घटना
घोरपडी येथे राहणार अलोक सर (वय ४०) हा एका विद्यार्थीनीची शिकवणी घेण्यासाठी घरी जात होता. ती विद्यार्थीनी घरी एकटीच असल्याचा फायदा घेऊन जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध तयार केले. विद्यार्थीने विरोध केल्यानंतर तिला धमकवत हा प्रकार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या लहान भावाला मारुन टाकेल, अशी धमकी दिली. यामुळे विद्यार्थीने चांगली घाबरली. तिने हा प्रकार कोणालाच सांगितला नाही. त्यानंतर तो शिक्षक नेहमीप्रमाणे शिकवण्यासाठी येत होता.
विद्यार्थीनी मासिक पाळी चुकली. यामुळे तिच्या घराच्या मंडळींनी तिला डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी ती गर्भवती राहिल्याचे समजले. त्यानंतर अलोक सरांसंदर्भातील प्रकार तिने सांगितला. अखेरी मुंढवा पोलिसांत अलोक सराविरोधात तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अलोक सरांना अजून अटक केली नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुणे शहरातील या धक्कादायक प्रकारामुळे विद्यार्थीनीच्या पालकांनाही चांगलाच धक्का बसला आहे. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.