पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा शहरात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत गर्भवती केल्याची घटना उघडकीस आल्याने एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाचोरा शहरातील एका परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस गेल्या काही दिवसापासून याच परिसरातील एका संशयीताने तब्बल तीन वेळा जबरदस्ती मुली सोबत अत्याचार करीत मुलीला गर्भवती केल्याने संशयित आरोपीच्या विरोधात अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे हे करीत आहे अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेले नाही.