जळगाव : प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील जामनेर रोड कुन्हे पानाचे गावाजवळ एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकत देह व्यापार करणाऱ्या तीन महिलांसह हॉटेल मालक व मॅनेजरला ताब्यात घेतले आहे. रविवारी ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल राजवाडा येथे देहव्यापार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिथे छापा टाकला असता. हॉटेल मालक पंडित बळीराम टोंगळे (५६, रा. कुम्हे पानाचे) तसेच संभाजी एकनाथ पाटील (४५, रा. जामनेर ) यांच्यासह तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी, शहर वाहतूक शाखाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रूपाली चव्हाण, प्रदीप पाटील, अनिल झुंजारवार यांनी केली आहे.