जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरात गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या दुचाकी, मोबाईल चोरीच्या घटना सातत्याने वाढ होत आहेत. यावर आता जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात सराईत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहे. दोन आरोपीना तालुका पोलिस स्टेशन तर एका आरोपीला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात घरफोडी चोरी व दुचकी चोरी गुन्हयातील आरोपीताचा शोध घेणे बाबत पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत , अशांनी केलेले मागदर्शन व सुचना नुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीतीचे आधारावर पथकातील सपोनि निलेश राजपुत, पो.उप निरी गणेश वाघमारे व पोलीस अंमलदार जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, संदीप सावळे, नितीन बाविस्कर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील, हेमंत पाटील, भारत पाटील, अशोक पाटील अशांचे पथकाने संशयीत आरोपी राजु भिमसिंग बारेला वय- २३ , दिपक सुमा-या बारेला वय-२९ दोघे रा. मधुकर नगर धरणगांव यांना ताब्यात घेवुन विचारपुस करता त्यांनी जळगाव तालुका पोस्टेलाआणि धरणगाव पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्याची कबुली देऊन चोरीच्या दोन दुचाकी काढून दिल्या. असा जप्त मुद्देमाल करून त्यांना जळगाव तालुका पोलीस स्टेशनला ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकाने एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी नामे रमेश फुलसिंग देवरे वय – २३ रा. श्रीकृष्ण लॉन ता. जि. जळगांव यास ताब्यात घेवुन विचारपुस करता त्यांचे कडुन गुन्हा उघडकीस आणुन त्याच्याकडून एक मोबाईल हा हस्तगत करण्यात आला असून त्याला पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.