पारोळा : प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार करून मुलीच्या डोक्यावर दगड मारून व दोरीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार झाला होता.
याप्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे याप्रकरणी संशयित तरुण बारक्या उर्फ अशोक मंगा भिल (१९) याच्याविरुद्ध पारोळा पोलिसात बलात्कार, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.