Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विमानतळावर दीड कोटीची चहा पावडर ; पोलिसांनी घेतले ताब्यात !
    क्राईम

    विमानतळावर दीड कोटीची चहा पावडर ; पोलिसांनी घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskAugust 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

     

    राज्यातील अनेक लोकांना चहा पिण्याचे वेड असल्याने अनेक व्यापारी अनेक देशातून मसाले आणून राज्यात चहा बनवून विकत असतात. पण एका व्यापारीने थेट चहा पावडरच्या पाऊचमध्ये कोट्यवधी रुपयांच्या हिऱ्यांची तस्करी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कस्टम विभागाने आरोपीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली.

     

    मुकीम रजा अश्रफ मन्सुरी असे आरोपीचे नाव असून तो मुंबईहून दुबईला जात होता. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या चहा पावडरच्या बॉक्समध्ये तब्बल दीड कोटींचे हिरे असल्याची माहिती मिळाली असून हा ऐवज जप्त केल्याचे सांगितले जात आहे.

    मुंबईतील नळ बाजार परिसरात राहणारा मुकीम रझा अश्रफ मन्सूरी (३०) हा मुंबईहून दुबईला जात होता. दरम्यान, कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मन्सूरीला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखले. तपासादरम्यान, मन्सूरीच्या बॅगमधून प्रसिद्ध चहा ब्रँडची पिशवी जप्त करण्यात आली. या पाऊचची तपासणी केली असता यातील आठ पाऊचमध्ये ३४ हिरे आढळून आले. ज्याची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. हिरे तस्करीसाठी पाच हजार रुपये मिळणार असल्याचे वचन दिल्याचे आरोपीने सांगितले. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे.

    #police Famous tea powder
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; काहींना चार हजार रुपयांचा लाभ

    February 5, 2026

    भरसभेतच उलट आदेश : “धनुष्यबाणाच्या उमेदवाराला मत नको” – शिंदेंच्या वक्तव्याने खळबळ

    February 5, 2026

    विश्वासघात हा उबाठा–राऊतांचा डीएनए”; नवनाथ बन यांचा जोरदार हल्लाबोल

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.