प्रतिनिधी प्रविण पाटील: तालुक्यातील विटनेर येथे सर आईसाठी गेलेल्या गुरांमधील गायीची शिकार बिबट्याने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास केली यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील विटनेर येथे वनविभागात चरण्यासाठी गेलेल्या गुरांमधुन बिबट्याने रविंद्र मुरलीधर नावडे यांच्या मालकीच्या गाईची शिकार केल्याचे संध्याकाळी ५च्या सुमारास लक्षात आले या घटनेमुळे या भागातील शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी याठिकाणी येऊन संबंधित घटनेची चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठववा व संबंधित गायमालकाला योग्य ती मदत करावी तसेच येथील शेतकरी तसेच ग्रामस्थ यांना आपले व आपल्या जनावरांचे कसं संरक्षण करावे यासाठी मार्गदर्शन करावे अशी चर्चा या भागातील नागरिकांनमध्ये होती.
या घटनेची माहितीसाठी आमच्या प्रतिनिधीने विटनेर येथील पोलिस पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटने संदर्भात घटना खरी असल्याचा दुजोरा दिला.