Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धावत्या ट्रेनची झाली बत्ती गुल अन प्रवाश्यांनी तिकीट चेकर सोबत केले असे !
    राष्ट्रीय

    धावत्या ट्रेनची झाली बत्ती गुल अन प्रवाश्यांनी तिकीट चेकर सोबत केले असे !

    editor deskBy editor deskAugust 12, 2023Updated:August 12, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

     

    देशातील प्रत्येक व्यक्तीला भारतीय रेल्वेचा प्रवास अगदी सुरक्षित वाटत असतो. कधीकधी या प्रवासात कडू-गोड अनुभवही येतात. असाच एक अनुभव एका ट्रेनमध्ये प्रवास करीत असतांना अनेक प्रवाश्यांना आला आहे. शुक्रवारी जे प्रवासी आनंद विहार येथून गाझीपूरला जाणाऱ्या सुहेलदेव ट्रेनमध्ये बसले. दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल ते उत्तर प्रदेशातील गाझीपूर पर्यंत जाणारी सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस तिच्या नेहमीच्या वेळेनुसार आनंद विहार येथून रवाना झाली.

    मात्र ट्रेन पुढे गेली असता थोड्याच वेळात ट्रेनमधील दोन कोचमधील वीजच गेली. पॉवर फेल्युअर झाल्यामुळे AC सुद्धा बंद पडला आणि उकाड्यामुळे लोकांची चिडचिड, राग आणखीनच वाढला. वाढत्या उकाड्यामुळे कोचमधील लहान मुलं आणि महिलांचा त्रास वाढला. B1 और B2 कोचमधील प्रवासी गरमीमुळे चिडले होते, तेवढ्यात त्यांना ट्रेनचा तिकीट चेकर (TTE) दिसला. मग काय, प्रवाशांनी त्याला सरळ धारेवर धरलं , सगळा राग त्याच्यावरच निघाला. पॉवर कटमुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी तिकीट चेकरला सरळ टॉयलेटमध्येच कोंडले. हे प्रकरण वाढताच रेल्वेचे कर्मचारी आणि रेल्वे पोलीस दलाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा हा प्रकार वाढत गेल्यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत रेल्वेच्या दोन डब्यातील वीजपुरवठा तातडीने दुरुस्त करण्याची सूचना कर्मचाऱ्यांना दिली.

    VIDEO | Due to a power failure in B1 and B2 coaches, the angry passengers created a ruckus and locked the TTE in the toilet in the Suhaildev Superfast Express going from Anand Vihar Terminal to Ghazipur on Friday. Soon after the departure of the train from Anand Vihar Terminal,… pic.twitter.com/cr1pIk5KSX

    — Press Trust of India (@PTI_News) August 11, 2023

    रात्री सुमारे 1 च्या सुमारास ट्रेन टुंडला रेल्वे स्टेशनवर पोहोचली असता, इंजिनिअर्सच्या टीमने ट्रेनच्या कोचमधील पॉवर कटचे कारण शोधण्यास सुरूवात केली. काही वेळानंतर B1 कोचमधील पॉवर कटची समस्या सोडवण्यात यश मिळाले. त्यानंतर B2 कोचमध्येही वीज पुन्हा आली आणि ट्रेन पुढल्या प्रवासासाठी रवाना झाली. सुहेलदेव सुपरफास्ट ट्रेनमधील हा बिघाड आणि त्यामुळे होणाऱ्या समस्यांबद्दल ट्रेनमधील प्रवाशांनी ट्विट करून आपल्या समस्या नोंदवल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, वीजपुरवठा दुरूस्त करण्यासाठी टुंडला रेल्वे स्थानकावर ट्रेन २ तासांहून अधिक काळ उभी होती. आधीच उशिराने धावणाऱ्या या गाडीला वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आणखी उशीर झाला. आता ही ट्रेन जवळपास 5 तास उशिराने धावत आहे.

    ट्रेन तिकीट चेकर
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ? : पडळकरांचा खळबळजनक आरोप !

    March 25, 2026

    भोंदू खरात प्रकरण पेटले; “मोठ्या लोकांचा हात” : दमानिया यांचा गंभीर आरोप

    March 25, 2026

    भोंदू बाबा प्रकरणावरून बच्चू कडू आक्रमक; “मला बदनाम करण्यामागे भाजपचा अजेंडा”

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.