बुलढाणा : वृत्तसंस्था
राज्यात तरुण व तरुणी थोड्या थोड्या कारणाने टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपविल्याच्या घटना नियमित घडत असतात. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी बु येथील २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. गोठ्यातील लोखंडी अँगलला तरुणाने गळफास घेतला. अशोक कलाजी लिपने असे या तरुणाचे नाव आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे.
अशोकचे वडील कलाजी लिपने हे साडेनऊच्या सुमारास बैलांना चारा टाकण्यासाठी ते गोठ्यावर गेले. यावेळी समोरील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांचा मुलगा अशोक गोठ्यातील अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला. यामुळे मोठा गोंधळ उडाला. त्याच्या रडण्याने घरातील इतर सर्वांनी त्याठिकाणी धाव घेतली. अशोकच्या गळ्यातील दोर सोडून त्याला खाली उतरविण्यात आले. त्यानंतर तात्काळ रुग्णवाहीकेतून सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अशोकला मृत घोषित केले. यामुळे ही घटना वाऱ्यासारखी पसरली.
दरम्यान, आता अशोकने आत्महत्या का केली? हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. मात्र यावर अनेकांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशोकच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध पोलिस घेणार आहेत. यामुळे लवकरच याबाबत याबाबत सविस्तर माहिती समोर येईल. या प्रकरणाचा तपास ठाणेदार वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस अंमलदार शरद ठोंबरे, रमेश गोरे, सलिम परसुवाले, सुभाष गिते हे करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे त्यांच्या घरच्याना मोठा धक्का बसला आहे.