• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दोन गटात तुफान दगडफेक आणि जाळपोळ ; वाचा कुठे घडली घटना !

editor desk by editor desk
August 11, 2023
in क्राईम
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

धुळे : वृत्तसंस्था

 

जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे आदिवासी क्रांती दिनाचे पोस्टर अज्ञात समाजकंटकांनी फाडल्याने गुरुवारी गावात दोन गटात तुफान दगडफेक आणि जाळपोळीचा प्रयत्न झाला. याप्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली असून गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत १२ जणांना पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.

सांगवीतील जोयदा रस्त्यावरील शाळेजवळ आदिवासी क्रांती दिनाचे पोस्टर फाडल्याचे वृत्त गावात पसरताच शेकडो आदिवासी बांधवांच्या संतप्त जमावाने दुसऱ्या समुदायावर दगडफेक केली. पोस्टर फाडणाऱ्यांना अटक करा, अशी मागणी केली. यातून तणाव वाढून गावात काही ठिकाणी जोरदार दगडफेक सुरू झाली. काही टपऱ्या उलथवून टाकण्यात आल्या, तर काही पेटवण्याचा प्रयत्नही झाला. यासोबतच काही गाड्यांचे काच फोडण्यात आले. मात्र, या वेळी होणारी मोठी दुर्घटना सांगवी पोलिसांनी प्रयत्न करून हाणून पाडली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच धुळे येथून एसआरपी, दंगल नियंत्रण पथक, जादा पोलिस बंदोबस्त तातडीने मागवण्यात आला. यासोबतच सांगवी गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले आहेत. त्यातील तीन जणांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यात लक्ष्मण भील (वय १८), शिवदास आसाराम भील (वय ४०), सुभाष विजय सोनवणे यांना गंभीर मार लागल्याने त्यांना धुळे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सांगवी पोलिसांसह शिरपूर, धुळे आणि इतर ठिकाणाहून आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले असून, त्यात काही जण गंभीर जखमी झाले.

दोन गटात झालेल्या दंगलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाभरातील पोलिसांचा फौजफाटा सांगवीत दाखल झाला. दंगलीची पाहणी केल्यानंतर आमदार काशीराम पावरा, पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, तहसीलदार महेंद्र माळी शांतता प्रस्थापित करण्यासाठी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक एका बाजूने दगडफेक सुरू झाली. दगडफेकीत आमदार काशीराम पावरा आणि तहसीलदार महेंद्र माळी यांच्या गाड्यांच्या काचा फुटल्या.

Tags: #policeCrimedagalfekdhule
Previous Post

राज्यात आरोग्य यंत्रणेत खळबळ : उपचार न मिळाल्याने ५ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू !

Next Post

टायगर ग्रुपचे पालकमंत्री पाटील यांना निवेदन ; वाचा काय केली मागणी !

Next Post
टायगर ग्रुपचे पालकमंत्री पाटील यांना निवेदन ; वाचा काय केली मागणी !

टायगर ग्रुपचे पालकमंत्री पाटील यांना निवेदन ; वाचा काय केली मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group