मुंबई : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील महानगरपालीकेच्या कळवा मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गंभीर घटना उघडकीस आली आहे. या रुग्णालयात उपचार न मिळाल्याने पाच रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला असून रुग्णालयात रुग्णांना तपसण्यासाठी डॉक्टरच येत नसून रुग्णांना वेळेवर औषधी दिली नसल्याचे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय. या संदर्भातील माहिती मिळताच आमदार जितेंद्र आव्हाड आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रुग्णालय प्रशासनावर अनेक गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात आली आहे.
रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले आहेत. मृत रुग्ण दाखल झाले तेव्हाच अत्यवस्थ असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यात पहिला रुग्ण दारूच्या आहारी गेलेले होता. त्याने श्वासनलिकेत उलटी केली. दुसरा पेशंट हा हृदविकार येऊन तिसऱ्या स्टेजला आला. दोन-तीन दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ते पुन्हा इकडे येतात. तीनही पेंशंट आधीच अत्यावस्थ होते, असेही रुग्णालय प्रशासन म्हटले होते.
ठाण्यातील शिवाजी रुग्णालया बाबतच्या तक्रारी कानावर येतच होत्या. आज एका महिलेचा फोन आला की, तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत, परंतु रुग्णालय प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीये. काय प्रकार आहे हे जाणून घ्यावा म्हणून रुग्णालयात गेलो असता, रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो, तळपायाची आग मस्तकात गेली. मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे दाखवून त्या रुग्णाच्या पार्थिवाला ICU मध्ये नेण्यात येते. रुग्णालयात गरिबांची फसवणूक आणि लूट सुरू असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.