Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तीन दिवसांपूर्वीच खरेदी केला होता कट्टा : गावठी कट्ट्यासह आरोपीच्या आवळल्या मुसक्या
    क्राईम

    तीन दिवसांपूर्वीच खरेदी केला होता कट्टा : गावठी कट्ट्यासह आरोपीच्या आवळल्या मुसक्या

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 10, 2023Updated:August 10, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    काही मिनिटात पोलिसांनी घेतले गोळीबार करणाऱ्याला ताब्यात : असा लावला छडा !

    शहरातील एमआयडीसी परिसरात जुन्या भांडणातून झालेल्या वादातून एकावर गावठी पिस्तुलाने गोळीबार केल्याची घटना काल सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी स्वप्नील उर्फ सोपान चंदूसिंग मोरे (राजपूत, 25, गजानन पार्क, रा.कुसुंबा, ता.जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    या संशयिताला केवळ अर्ध्याच तासात मन्यारखेडा फाट्याजवळून एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत मुद्देमाल बंदूक व काडतूससह अटक केली आहे. संशयिताला लगेच अटक करण्यात यश आल्यामुळे एमआयडीसी पोलिसांचे पोलीस अधीक्षकांसह नागरिकांनी कौतुक केले आहे.

    आकाश प्रेम तंवर (वय २४, रा. गजानन पार्क, कुसुंबा ता. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. तो गुरुवारी १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता कंपनीत कामावर जात होता. एमआयडीसी सेक्टर नंबर व्ही येथील प्रभा पॉलिमर कंपनी जवळ जात असताना आकाश तंवर त्याचा मित्र रोहित पवार तसेच अनिल सैंदाणे, समाधान पाटील, भरत चांदवडे, धीरज पवार हे गप्पा करीत उभे असताना त्या ठिकाणी संशयित आरोपी स्वप्निल उर्फ सोपान चंदूसिंग मोरे (रा. गजानन पार्क, कुसुंबा) हा त्याचे मित्र विपुल पाटील व अजय पाटील (दोन्ही रा. कुसुंबा) यांच्यासोबत आला. स्वप्नील आकाश तंवर याला म्हणाला की, बब्या कुठे आहे, त्याने तुझ्या सांगण्यावरून मला मारले आहे. आज तुमच्या दोघांचा गेम करतो. त्यावर आकाश तंवर याने, बाब्याबाबत मला काही माहिती नाही, असे सांगितले.

    मात्र त्याचे वाईट वाटून स्वप्नील मोरे याने कमरेला लावलेला बंदूक कट्टा काढून आकाश तंवर याच्यावर रोखला. आधी तुझे व नंतर बब्याचे काम करतो असे स्वप्निल मोरे म्हणाला. त्यावेळी त्यानी गोळी झाडली. पण आकाशने खाली वाकून गोळीचा नेम चुकवला आणि रस्त्यात पडलेला दगड उचलून संशयित स्वप्नील मोरे यांच्या दिशेने फेकला. त्यानंतर स्वप्निल मोरे याने पुन्हा दुसरी गोळी आकाश तंवर याच्यावर फायर केली. ही गोळी आकाशच्या अंगाच्या जवळून गेली. नंतर पुन्हा तिसरी गोळी झाडत असताना त्याचे पिस्तूल अडकले. त्यामुळे घाबरून आकाश याने पुन्हा दुसरा दगड उचलून त्याच्यावर फेकत असताना स्वप्नील मोरे आकाश याच्या जवळ गेला. डोक्यावर पिस्तुलाने मारले. नंतर आकाशच्या हातात दगड सापडल्याने तो पळून गेला.

    ही घटना आकाश तंवरच्या मित्रांनी पाहिली. संशयित स्वप्नील मोरे यांच्यासोबत आलेले विपुल पाटील, अजय पाटील हे लगेच मोटरसायकल घेऊन त्याच्यामागे गेले आणि त्याला दुचाकीवर बसवून प्रभा पॉलिमर येथून निघून गेले. त्यानंतर आकाश तंवर याने त्याचा काका राजेश पवार यांना घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. त्या ठिकाणी त्याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. संशयित आरोपींच्या शोधार्थ पोलीस रवाना झाले आहेत.

    सोपानने तीन दिवसांपुर्वीच 16 हजार रूपयात गावठी कट्टा आणि तीन काडतूस खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबार करणारा स्वप्नील हा मन्यारखेडा येथे आहे. माहीती मिळाल्यावर लागलीच मन्यारखेडा येथे गुन्हे शोध पथकाचे पोउनी दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोना सुधीर सावळे, इमरान सैय्यद, सचीन मुंढे, योगेश बारी, किशोर पाटील, सचीन पाटील, मुदस्सर काझी, मुकेश पाटील, छगन तायडे, किरण पाटील, साईनाथ मुंढे, महिला पोना निलोफर सैय्यद अशांनी जावून त्याला मन्यारखेडा फाट्याजवळून ताब्यात घेतले.

    त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले असून व त्याचे अंगझडतीमधे त्याने गुन्हयात वापरलेले २० हजार रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा आणी एक जिवंत काडतुस काढुन दिलेले आहे. त्याला अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असुन गुन्हयाचा तपास पोउनी दिपक जगदाळे, योगेश बारी हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    प्रेमसंबंधांचा थरारक शेवट; ८ महिन्यांच्या गरोदर प्रेयसीवर विषप्रयोग : प्रियकर अटकेत !

    February 27, 2026

    अजित पवार विमान दुर्घटनेवरून राज्यात खळबळ; कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक

    February 27, 2026

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.