चाळीसगाव : प्रतिनिधी तहसील कार्यालयाच्या लिपिकाला अडीच हजारांची लाच घेताना धुळ्याच्या लाचलुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात अटक केली असून या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, दीपक बाबूराव जोंधळे , वय- 47 फौजदारी लिपिक (दंडप्र) तहसील कार्यालय, चाळीसगाव जि. जळगाव, रा. शास्त्रीनगर प्लॉट नंबर 16 कापड मिल मागे चाळीसगाव जि. जळगाव. असे संशयिताचे नाव आहे.
यातील तक्रारदार याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, तक्रारदार यांचे पक्षकारांविरुद्ध दाखल गुन्ह्या मध्ये मेहुनबारे पोलीस स्टेशन कडून प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चाळीसगाव यांच्याकडे सादर करण्यात आला होता. सदर प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण दाखल करून त्यामधील आरोपी यांना पुढील तारीख न देता जामिनावर मुक्त करण्याकरिता मदत करण्यासाठी यातील दीपक जोंधळे यांनी 2500/- रुपयाची लाचेची मागणी करून सदर रक्कम ही पंचांसमक्ष स्विकारली आहे. जोंधळे यांचे विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. आहे. हि कारवाई धुळे अँटीकरप्शन विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह पो. हवा. राजन कदम, शरद काटके, पो. शि. संतोष पावरा, गायत्री पाटील, मकरंद पाटील, चालक पोवीस हवालदार सुधीर मोरे आदींच्या पथकाने केली .