Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » छत्रपती संभाजीनगर हादरलं : शुल्लक कारणाने तरुणावर गोळीबार !
    क्राईम

    छत्रपती संभाजीनगर हादरलं : शुल्लक कारणाने तरुणावर गोळीबार !

    editor deskBy editor deskAugust 10, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

     

    राज्यात सुरु असलेल्या गुन्हेगारीच्या घटना दिवसेदिवस वाढत चाललेल्या असून पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपुरा भागात एक थरारक घटना घडली आहे. या परिसरात एका तरुणावर गावठी पिस्तुलीने गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात देखील घेतले आहे.

    काय घडली घटना

    बायजीपुरा परिसर अतिशय रहदारीचा भागा म्हणुन ओळखला जात असतो. या परिसरात गोळीबारामध्ये एक तरूणाचा दुर्देवी मृत्यु तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हि घटना बुधवारी सायंकाळी साडे ७ च्या सुमारास गल्ली नंबर 18 मधील बौध्द विहारसमोर घडली आहे. 24 वर्षीय तरूणाचे दहा दिवसांनी लग्न असल्यामुळे टेलरकडे कपड्याचे माप देऊन घरी परत येत असतांना एकाने तरुणावर गावठी कट्टयाने गोळीबार केला. हि हत्या हात उसने घेतलेले साडे सात हजार परत मागीतल्याच्या कारणावरून झाल्याचे समजते. गल्लीनंबर 14 बायजीपूरा येथील २४ वर्षीय तरूण हमद अब्दुल्लाह सालेह कुतूब चाउस असे मयत तरूणाचे नाव असून इरफान पठाण हा तरुण जखमी झाला आहे. गोळीबार करणार्‍या युवकाचे नाव फैय्याज पटेल 27 रा. गल्ली नंबर 21 बायजीपुरा असे या आरोपीचे नाव आहे. मयत हमद चाउस हा पैठणगेटवरील कपडयाच्या दुकानात काम करत होता. त्याच्या आई व तो दोघेही बायजीपुरा भागात राहतात. 20 ऑगस्टला त्याचा विवाह असल्याने तो बायजीपुरा भागातील टेलरकडे लग्नाचे कपडे शिवण्यासाठी तो माप देण्यासाठी गेला. माप दिल्यानंतर तो घरी जात असतांना त्याच्या ओळखीचा आरोपी फैय्याज पटेल यांनी काही समजण्याच्या आधीच त्याने गोळीबार करण्यास सुरूवात केली. आरोपी फैय्याज याने 4 राउंड फायर केले यात हमदचा जागीच मृत्यु झाला तर इरफान च्या हाताला गोळी लागल्याने त्याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

    घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्‍वर रेंगे पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर, घटनेचे गांभिर्य लक्षात घेता पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनीही घटनास्थळी धाव घेतले. पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, निर्मला परदेशी यांच्या पोलिस दलातील बडे अधिकारी व कर्मचारी हजर होते.

    Chhatrpati sambhajinagar nagar Golibar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ४०० कोटींच्या कथित रोख चोरी प्रकरणात अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघड

    January 24, 2026

    मुंब्रा विजय भाषणातील वक्तव्यावरून वाद; सहार शेख यांचा खुलासा व माफी

    January 24, 2026

    फॉरेन्सिक अहवालातून धागेदोरे; अभिनेता केआरके गोळीबार प्रकरणात ताब्यात

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.