जळगाव : प्रतीनिधी
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून हत्या केल्या प्रकरणाचा खटला जलदगती चालवू तसेच आरोपीला कठोर शिक्षा होण्याबाबत कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. पीडित परिवाराला तत्काळ घरकूल मंजूर करून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकारी हे मंगळवारी रावेर येथे आले होते. त्यावेळी क्षत्रिय सूर्यवंशी मराठा समाजाने त्यांना निवेदन दिले. त्यावर जिल्हाधिकारी यांनी वरील आश्वासन दिले.
शहरातील राजे छत्रपती शिवाजी चौक परिसरात क्षत्रिय सूर्यवंशी मराठा समाजातर्फे शोकसभा घेऊन गोंडगाव येथील मयत पीडित बालिकेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान क्षत्रिय सूर्यवंशी मराठा समाजातर्फे तहसील कार्यालयावर धडक देत निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा समाजाचे अध्यक्ष गंगाराम दाणी, उपाध्यक्ष अशोक शिंदे, सचिव श्रीराम पाटील, दिलीप पाटील, राजेश शिंदे, ज्ञानेश्वर महाजन, शालिक महाजन, सुभाष शिंदे, दिलीप गायकवाड, मिलिंद महाजन, भावलाल महाजन, अशोक गायकवाड, सुनील महाजन, मुकेश पाटील, मधुकर शिंदे, विजय महाजन, दीपक शिंदे, धनराज महाजन, पिंटू महाजन, बापू महाजन, सदाशिव पाटील, धनराज महाजन, उमाकांत महाजन, दीपक शिंदे, पुष्पराज महाजन, ज्ञानेश्वर पाटील, माधवराज राऊत, शिवलाल शिंदे, ईश्वर शिंदे, मनोज पाटील, अशोक महाजन, अनिल महाजन, भूषण महाजन, हर्षल गायकवाड, योगेश शिंदे, सीमा दाणी, पूजा महाजन, संगीता गायकवाड उपस्थीत होते.