Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ८ जणांचा बळी घेणाऱ्या घराचे काय आहे सत्य ?
    राष्ट्रीय

    ८ जणांचा बळी घेणाऱ्या घराचे काय आहे सत्य ?

    editor deskBy editor deskAugust 9, 2023Updated:August 9, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    शिल्पकला आता प्रचंड पुढारली आहे. घरांना या कलेने अनोखा आकार देता येतो. आपल्याला जसं हवं तसं घर सजवता येतं. काहीजणसंपूर्ण घराला बागीचा बनवतात, काहीजण दरवाजापासून शेवटच्या कोपऱ्यापर्यंत अगदी गुहेसारख्या घरात राहणं पसंत करतात.
    गावात किंवा परिसरात एखादं पडकं घर असेल, तर आपण गंमतीत त्या वास्तूला भूत बंगला म्हणतो. उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात मात्र खराखुरा भूत बंगला वाटावा, असं घर आढळलं. या घरातल्या विजेच्या तारांना चिकटून एका 4 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस घरात शिरले असता अत्यंत विचित्रपणा समोर आला.मुलीच्या मृत्यूविरोधात तिच्या कुटुंबीयांनी घर मालकावर कलम 304 अंतर्गत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी शमशेर उर्फ बबलू याला अटक केली. त्याच्या घरात कोणीही प्रवेश करू नये म्हणून त्याने चालू विजेच्या तारांचं जाळं पसरवून ठेवलंय.

    शेजारची मुलं गुपचूप या घरात जायची. तीन मुलं गेली असता कोणाला काही झालं नाही, मात्र चौथ्या मुलीचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे या घरात यापूर्वी सात जणांचा मृत्यू झाला होता. शिवाय पत्नी, भाऊ आणि बहिणींना घराबाहेर काढून शमशेर इथे एकटाच राहत होता.

    त्याचं घर पाहून पोलीसही हैराण झाले.Today Rashibhvishya: जीवनात रस निर्माण होईल, या राशींना आजचा दिवस शुभघरात वर्षानुवर्षे कोणी केर काढला नसावा इतका कचरा होता. सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. भिंतीवर सर्वत्र काहीतरी लिहिलेलं होतं, जे सहसा वाचता येत नाही. भिंतीवर मृत्यूच्या बातम्यांची कात्रणंही लावलेली आढळली.

    एका भिंतीवर भूताचं चित्र काढलं होतं आणि फाशी दिली जाते तसं कापडही गुंडाळलं होतं. या कापडालासुद्धा विजेच्या तारा होत्या.’दृष्ट लागण्या जोगे सारे..’ या गाण्यातील ‘ती’ सुंदर मराठमोळी अभिनेत्री आठवतेय का? गंभीर अजाराने झाला मृत्यूयाबाबत गावकऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी सांगितलं, ‘शमशेर हा व्यसनाधीन आहे, तो कायम नशेत असतो. जेव्हा बघावं तेव्हा तो भिंतींशी बोलत असतो.

    लोकांना पाहिलं की शिव्या द्यायला सुरुवात करतो. त्याला कोणी प्रत्युत्तर दिल्यावर स्वतःच घर सोडून गावातल्या सर्व घरांवर तुफान दगडफेक करतो. त्यामुळे त्याच्याशी कोणी बोलायला जात नाही आणि त्याच्या घरातही कोणी जात नाही. मात्र काही मुलं खेळता खेळता गेली आणि त्यात एका मुलीला विजेच्या तारांचा स्पर्श होऊन तिचा मृत्यू झाला.’

    8 people died Home
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ? : पडळकरांचा खळबळजनक आरोप !

    March 25, 2026

    भोंदू खरात प्रकरण पेटले; “मोठ्या लोकांचा हात” : दमानिया यांचा गंभीर आरोप

    March 25, 2026

    भोंदू बाबा प्रकरणावरून बच्चू कडू आक्रमक; “मला बदनाम करण्यामागे भाजपचा अजेंडा”

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.