चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील ज्वेलर्सचे शटर तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मेहूणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहुनबारे येथील रहिवासी कुंदन प्रभाकर बाविस्कर (वय ४५) हे सराफा व्यावसायिक असून त्यांचे स्वामी समर्थ केंद्रा जवळ कुलस्वामिनी ज्वेलर्स नावाचे दुकान असून ७ ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते ८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने 55 हजार रुपये किमतीचे सातशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जोडवे बनविण्याची चांदीची तार, १२ हजार रुपये किमतीचे तीन ग्राम वजनाचे सोन्याच्या नाकातील फुल्या असा एकूण 67 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस स्टेशनला कुंदन बाविस्कर यांनी आठ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता फिर्याद दिल्यावर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक जालमसिंग पाटील करीत आहे.


