सावदा : प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील शहरातील एका उर्दू शाळेमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीला कार्यालयात बोलावून तिला नवीन नकाब देतो असे आम्हीच दाखवून ऑफिस बंद करून तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा घृणास्पद प्रकार येथे तीन ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा सावदा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एक तेरा वर्षीय विद्यार्थिनी ही अँग्लो उर्दू हायस्कूल गोसिया नगर येथे शिकत असून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संशयित अक्रम खान अमानुल्ला खान राहणार रजा नगर सावदा तालुका रावेर याने तिला ऑफिसमध्ये बोलावून तुला नवीन नकाब देतो यासाठी तुझा टेलर सारखा माप द्यावा लागेल असे आमिष दाखवून ऑफिसचा दरवाजा आतून बंद करून लाईटही बंद केली. नकाबचे माप घेण्याच्या बहाण्याने मुलीच्या संवेदनशील भागाला स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच या प्रकाराची वाचता केल्यास तुला शाळेतून काढून टाकण्याची धमकी संशयिताने दिली. मुलीने हा प्रकार तात्काळ मुख्याध्यापक इरफान खान जमशेद खान राहणार फैजपूर तालुका यावल यांना सांगितला. मात्र त्यांनीही घटनेबाबत कुठेच वाच्यता करू नये असे सांगून कोणासही न सांगण्याचे प्रवृत्त केले. सदर घटना मुलीने आपल्या आई वडिलांना सांगितल्याने सात ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पीडीतेच्या फिर्यादीवरून साधा पोलीस स्टेशनला संशयित अक्रम खान अमानुल्ला खान,, इरफान खान जमशेद खान आणि फिरोज खान सुपडू, शेख अश्रद शेख सईद दोघे राहणार सावदा तालुका रावेर या चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.