Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सावखेडा बु” येथील जवान पठाणकोट येथे चकमकीत शहिद
    जळगाव

    सावखेडा बु” येथील जवान पठाणकोट येथे चकमकीत शहिद

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 14, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पाचोरा तालुक्यातील सावखेडा बु” येथील ३५ वर्षाचा जवान नक्षलवाद्यांशी लढतांना शनिवारी मध्यरात्री पठाणकोट (पंजाब) येथे शहिद झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सावखेडा बु”, सावखेडा खु”, वरखेडी, डांभुर्णी, मोंढाळे ता. भुसावळ सह परीसरात मोठी शोककळा पसरली असून सावखेडा गावी घटनेची माहिती मिळताच मोठा जनसमुदाय लोटला होता. वृद्ध आई वडील, दोन भावंडासह नातेवाईक व गावकऱ्यांनी एकच आक्रोश केला. शहिद जवानाचे पार्थीव सोमवारी पठाणकोट येथून विमानाने औरंगाबाद येथे आल्यानंतर तेथुन मिलट्रीच्या वाहनातून गावी आणल्यानंतर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

    पाचोरा शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सावखेडा बु” येथील जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (वय – ३५) हा सन – २००५ मधे अलीबाग येथे भारतीय सैन्यात भर्ती झाल्यानंतर त्याने सिकंदराबाद येथे प्रशिक्षण घेतले होते. सन – २०१४ मधे त्याचा मोंढाळे ता. भुसावळ येथील मुलीशी विवाह झाल्यानंतर त्यास दोन मुली व एक मुलगा असे तीन आपत्य आहेत. पत्नी व कुटुंब मंगलसिंग जयसिंग सोबतच राहत होते.

    दसऱ्याला घरी आल्यानंतर १५ दिवसांपूर्वी पठाणकोट येथे सेवेत झाला होता हजर

    मंगलसिंग जयसिंग परदेशी हा दसऱ्यानिमित्त एक महिन्यासाठी घरी आपल्या कुटुंबासह सुटीवर आला होता. दि. ३० आॅक्टोबरला सुटी संपल्यानंतर पठाणकोट येथे सेवेत हजर झाला होता. या वर्षातील डिसेंबर अखेर सुटी संपल्याने गावी चार ते पाच रविवारी भैरवनाथाची यात्रा भरत असल्याने पुढील वर्षी जानेवारी महिन्यात यात्रेसाठी एक महिन्याच्या सुटी घेऊन कुटूंबीयासह सुटीवर येणार असल्याचे जातांना सांगून गेला होता.

    मंगलसिंग जयसिंग परदेशी याचा स्वभाव सतत हसरा व मनमिळावू होता. नवनविन मित्र जमविने, त्यांचेशी मैत्री करणे ही त्याचा स्वभाव गुण होता. सावखेडा बु” व सावखेडा खु” या दोन्ही गावात सुमारे ३० ते ३५ युवक भारतीय सैन्यात सेवेत असल्याने सुटीवर आल्यानंतर गावी आलेल्या मिंत्रांना भेटून त्यांची चौकशी करणे व त्यांच्यात वेळ घालविणे याची आवडत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जामनेरमध्ये बोगस मतदानाचा थरार : कार्यकर्त्यांनी तरुणाला केंद्रावरच पकडलं

    December 2, 2025

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.