नाशिक : वृत्तसंस्था
अनेक तरुण आज देखील रोजगार व नोकरीसाठी अनेक परीक्षा देत असतील पण ज्या तरुणांचे आयटीआयचे शिक्षण पूर्ण झाले असतील त्यांनी या ठिकाणी जर अर्ज केलेत तर तुम्हाला नक्की नोकरी मिळू शकते.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे काही जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांसाठी ६४७ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२३ आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्जाची पद्धत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव रिक्त पदे –
पदवीधर अप्रेंटिस – १८६
डिप्लोमा अप्रेंटिस – १११
ITI अप्रेंटिस – ३५०
एकूण रिक्त पदे – ६४७
शैक्षणिक पात्रता –
पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात पदवी.
डिप्लोमा अप्रेंटिस – संबंधित विषयात डिप्लोमा.
ITI अप्रेंटिस – संबंधित ट्रेड मध्ये ITI पास.
अर्ज फी – भरतीसाठी अर्ज करायला कोणतीही अर्ज फी नाही.
अधिकृत बेवसाईट – https://hal-india.co.in/
नोकरीचे ठिकाण – नाशिक.